नवी दिल्ली -रामलीला मैदानावर आज अरविंद केजरीवाल यांनी सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना शपथ दिली. यावेळी रामलीला मैदानावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मनिष सिसोदिया, गोपाल राय, कैलाश गेहलोत आणि इम्रान हुसैन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आप समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
आज तुमच्या मुलाने तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. हा फक्त माझा विजय नसून प्रत्येक आई, बहीण आणि दिल्लीकराचा विजय आहे. दिल्लीचा वेगाने विकास कसा होईल, हा सगळ्यांचा प्रयत्न आहे. केजरीवाल म्हणाले, दिल्लीकरांनो घरी फोन करून सांगा, कि तुमचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे. आता निवडणुका झाल्या आहेत. काही लोकांनी आम्हाला तर काहींनी भाजप, काँग्रेसला मतदान केले कोणी कोणत्याही पक्षाचा समर्थक असू द्या, मी आता सर्वांचा मुख्यमंत्री आहे.
सर्व दिल्लीकर माझ्या कुटुंबाचा हिस्सा आहेत. कोणतेही काम असूद्या माझ्याकडे या. मी सर्वांचे काम निष्पक्षपातीपणे करेल. मी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे. निवडणुकीवेळी खूप राजकारण झाले. विरोधकांनी जे काही आम्हाला म्हणाले, त्यांना मी माफ करतो. मी केंद्र सरकार बरोबर राहून दिल्लीला पुढे नेऊ इच्छितो, असे केजरीवाल म्हणाले.
जे नागरिक दिल्लीला चालवतात. ते आज पाहुणे म्हणून येथे आले आहेत. दिल्लीला शिक्षक, रिक्षाचालक, विद्यार्थी, नोकरदार चालवत आहेत. आज हे नागरिक शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत. येणार काळ भारताचे भविष्य असणार आहे.
काय म्हणाले केजरीवाल?
- २१ व्या शतकात नव्या राजकारणाला सुरवात
- हम होंगे कामयाब हे गीत केजरीवाल यांनी मंचावरून गायले
- शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. मात्र, ते येऊ शकले नाही. कदाचित ते दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असतील. दिल्लीच्या विकासासाठी मी पंतप्रधान आणि केंद्र सरकारकडून आशिर्वाद घेतो - केजरीवाल
- दिल्लीचा मुलगा शपथ घेत आहे, असे म्हणत केजरीवाल यांनी दिल्लीकरांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते.
-
आईने मुलावर केलेलं प्रेम मोफत असते. त्याप्रमाणे जो मुख्यमंत्री मुलांकडून शाळेसाठी शुल्क घेईल, मोफत इलाज देऊ शकत नाही. दिल्ली मॉडेल आता सगळ्या देशात पुढे येत आहे. एक दिवस भारताचा डंका संपूर्ण जगात वाजेल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हम होंगे कामयाब हे गीत गायले.
- केजरीवालांनी गायली कविता
जब भारत मां का हर बच्चा
अच्छी शिक्षा पाएगा
जब भारत के हर बंदे को
अच्छा इलाज मिल पाएगा