महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

..म्हणून अरविंद केजरीवालही खेळणार नाहीत होळी - अरविंद केजरीवाल

दिल्ली हिंसाचार आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी आपण होळी खेळणार नसल्याचे म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

By

Published : Mar 4, 2020, 3:15 PM IST

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची संख्या 28 वर पोहोचली आहे. दिल्ली हिंसाचार आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी आपण होळी खेळणार नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदा होळी खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.

दिल्ली हिंसाचार आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मी यंदा होळी साजरी करणार नाही. दिल्लीमध्ये दुर्दैवी असा हिंसाचार झाला असून त्यामध्ये अनेकजण ठार झाली आहेत. या दु:खाच्या क्षणी मी किंवा इतर कोणताही मंत्री आणि आमदार होळी खेळणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

जगभरातील तज्ज्ञांनी कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये, यासाठी एखाद्या ठिकाणी गर्दी न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा आपण होळी खेळणार नसल्याचे टि्वट करुन जाहीर केले आहे. तसेच भाजप पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रदेशाध्यक्षांना होळीचे कार्यक्रम राज्यात आयोजित करु नये, असे सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण सर्वांत प्रथम चीनमधील वुहान प्रांतात आढळला होता. यानंतर जगभरातील देशांमध्ये या विषाणूचा वेगाने प्रसार झाला.

ABOUT THE AUTHOR

...view details