महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'दिल्ली मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास उशीर का? हा प्रकार धक्कादायक' - arvind kejriwal on EC

निवडणूक आयोग काय करतोय? किती लोकांनी मतदान केले, याची माहिती निवडणूक आयोग का जाहीर करत नाही? निवडणूक होऊन बराच काळ लोटला आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवाल

By

Published : Feb 9, 2020, 5:39 PM IST

नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काल (शनिवारी) मतदान पार पडले. मात्र, केंद्रिय निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी अद्यापही जाहीर केली नाही. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. मतदान होऊन अनेक तास झाल्यानंतरही माहिती जाहीर होत नाही, हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

निवडणूक आयोग काय करतोय? किती लोकांनी मतदान केले, याची माहिती निवडणूक आयोग का जाहीर करत नाही? निवडणूक होऊन बराच काळ लोटला आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने अधिकृत आकडेवारी अद्यापही जाहीर केली नाही. ६० टक्क्यापर्यंत मतदान झाल्याची शेवटची प्राथमिक माहिती हाती आली होती, मात्र, अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे.
आपचे प्रवक्ते संजय सिंह यांनीही पत्रकार परिषद घेत हा प्रश्न उपस्थित केला आहे. माहिती जाहीर करण्यास उशीर का झाला? याचे उत्तर सिंह यांनी मागितले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी आयोगाने एका तासाच्या आत आकडेवारी जाहीर केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. दिल्लीसारख्या छोट्या राज्याची आकडेवीरी जाहीर करण्यास उशीर का होत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details