नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर अमित शाह देशाचे गृहमंत्री असतील. ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील त्या देशाचे काय होईल? असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. तसेच मतदानापूर्वी दिल्लीच्या जनतेने विचार करावा, असेही केजरीवाल म्हणाले.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास अमित शाह देशाचे गृहमंत्री असतील - अरविंद केजरीवाल - modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले, तर अमित शाह देशाचे गृहमंत्री असतील. ज्या देशाचे गृहमंत्री अमित शाह असतील त्या देशाचे काय होईल?
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास अमित शाह हे देशाचे गृहमंत्री - अरविंद केजरीवाल
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होत आहे. यात दिल्लीच्या ७ जागांचाही समावेश आहे. केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे दिल्लीच्या जनतेला विचार करून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.