महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या - killed

अरुणाचल प्रदेशमधील एका आमदारासहित त्यांच्या कुटुंबातील ९ जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिरोंग अबोह असे त्यांचे नाव आहे.

नवी दिल्ली

By

Published : May 21, 2019, 4:11 PM IST

Updated : May 21, 2019, 4:32 PM IST

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशमधील एका आमदारासहित ९ जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तिरोंग अबोह असे त्या आमदाराचे नाव आहे. ते नॅशनल पीपल्स पक्षाचे नेते आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

अबोह यांच्या कुटुंबातील काहीजण, त्यांचे सुरक्षारक्षक आणि वाहनचालकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनएससीएन (आयएम) यांच्याकडून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशमधील पाटसुंग भागात घडली आहे. येथे एनएससीएनच्या कार्यकर्त्यांनी अबोह यांच्यावर गोळ्या झाडल्या.

Last Updated : May 21, 2019, 4:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details