नवी दिल्ली - वाराणसी लोकसभा मतदारसंघातून प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवणार नाहीत, असे वृत्त समोर आल्यावर अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपासून प्रियांका गांधी या नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी निवडणूक लढवतील, अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. मात्र, प्रियांका यांनी ऐनवेळी या निवडणुकीतुन माघार घेतली आहे. यावर अरूण जेटली यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
'बंद मुठ्ठी तो लाख की, खुल गयी तो खाक की', जेटलींचा प्रियांका गांधीवर निशाणा - varanasi
अरूण जेटली म्हणाले, की 'देश आता वंशवादाला मानत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जो काम करेल, त्यालाच देश स्वीकारेल.
!['बंद मुठ्ठी तो लाख की, खुल गयी तो खाक की', जेटलींचा प्रियांका गांधीवर निशाणा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3110443-676-3110443-1556255565567.jpg)
अरूण जेटली म्हणाले, की 'देश आता वंशवादाला मानत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जो काम करेल, त्यालाच देश स्वीकारेल. ही निवडणूक एक ऐतिहासिक लढत ठरली असती. मात्र, शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्ष घाबरला. दोन आठवड्यांपासून राहुल गांधी प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहे, असे म्हणत होते. प्रियांका देखील आपल्या भाषणांतून मोठी-मोठी आश्वासने देत होत्या. मात्र, आता त्यांनी या निवडणुकीतून माघार घेऊन आता दुसऱ्याच व्यक्तीला तिकीट दिले आहे. त्यामुळे, 'बंद मुठ्ठी तो लाख की, खुल गयी तो खाक की', असा टोला त्यांनी काँग्रेस पक्षाला लगावला आहे.
आता वारणसीच्या लोकसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून अजय राय हे निवडणूक लढवणार आहेत. मागच्या वर्षीदेखील अजय राय यांनी मोदींविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना हार पत्कारावी लागली होती.