नवी दिल्ली -भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील जेटली यांची एम्स रूग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.
अरूण जेटलींना भेटण्यासाठी मोहन भागवत 'एम्स'मध्ये दाखल - माजी अर्थमंत्री अरुण जेटली
दिल्लीच्या 'एम्स' रुग्णालयात उपचार घेत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेटली यांची एम्समध्ये भेट घेतली आहे.
जेटली यांची नाजूक प्रकृती पाहून शनिवारी डॉक्टरांनी त्यांना वेंटिलेटरवरुन ईसीएमओवर शिफ्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून जेटली यांच्या प्रकृतीत चढउतार पाहायला मिळत आहेत. फुफ्फुसांमध्ये पाणी झाल्यामुळे नऊ ऑगस्टला सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीही राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी जेटली यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.