महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेएनयू : एकापाठोपाठ आंदोलने आणि आता हिंसाचार - mob entered JNU

जेएनयूवर राजकीय स्वरुपाचे हल्ले होतात. यामध्ये विरोधाभास हा आहे की, एकीकडे जेएनयुमध्ये बुद्धीवादाविषयी तिरस्कार आहे. तर दुसरीकडे, येथे शिकवण्याबाबत तसेच शिकण्याबाबत अजिबात गांभीर्य नसल्याचा हास्यास्पद दावा केला जात आहे.

जेएनयू
जेएनयू

By

Published : Jan 11, 2020, 5:32 PM IST

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) अधोगतीचा दर वेगवान राहिला आहे. विद्यापीठात सुसंस्कृत पद्धती शिक्षणाचा उच्च दर्जा जोपासला जातो आणि येथील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होते.

याच विद्यापीठाच्या परिसरात रविवार, 5 जानेवारी 2020 ला संध्याकाळी हिंसाचाराची घटना घडली. भीतीदायक किंकाळ्यांसह झालेला हिंसाचार कॅमेऱ्यात कैद झाला आणि माध्यमांद्वारे देशात आणि जगभरात दाखवला गेला. अशा प्रकारच्या धक्कादायक घटना मोदी सरकारने घेतलेल्या काही निर्णयांविरुद्ध सुरु झालेली चळवळ दृढ करण्यास मदत करत आहेत.

बॉलीवूडमधील सेलिब्रिटी जेएनयूच्या समर्थनार्थ पुढे आले असून, विशेषतः दिपीका पदूकोण हिने प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन हिंसाचारात जखमी झालेल्या जेएनयूएसयू अध्यक्ष आइशी घोष हीची भेट घेतली. या प्रकारी वस्तुस्थिती कोणत्याही सरकारला त्रस्त करुन सोडेल. मात्र, हे सत्तेतील सरकार जरा जास्तच भक्कम आहे. ज्याची माघार घेण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

जामिया इस्लामिया विद्यापीठात झालेल्या अत्याचारावर पोलीसांचा क्रुर आणि तत्पर प्रतिसाद तर जेएनयूमध्ये कारवाईबाबत दिसून आलेली दिरंगाई आणि निरीच्छा लगेचच लक्षात येते. एकीकडे जामियाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून बाहेर जाण्यासाठी भाग पाडण्यात आले तर दुसरीकडे जेएनयू हिंसाचारात बाहेरुन चेहरा लपवून आलेल्या लोकांना मात्र निर्धास्तपणे जाऊ देण्यात आले, यादोन्ही घटनांमधील विरोधाभास लक्षात घेणे गरजेचे आहे.

जेएनयूसंदर्भात सध्याची व्यवस्था जरा जास्तच संवेदनशील आहे. विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार सुरु असताना बाहेरील प्रवेशद्वारावर स्वराज्य अभियान पक्षाचे योगेंद्र यादव यांना धक्काबुक्की करण्यात आली. यादव यांच्या मते, जेएनयूवर बौद्धिक हल्ले होत आले आहेत. यानंतर, देशद्रोह प्रकरणासारख्या राजकीय हल्ल्यांद्वारे पद्धतशीरपणे विद्यापीठाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाला होता. आता हे हल्ले सरळसरळ शारीरिक हिंसाचाराच्या पातळीवर पोहोचले आहेत.

सुरुवातीचे हल्ले भाजपमधील अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या बुद्धिवाद्यांच्या रुपाने झाले. यामध्ये स्वपन दासगुप्ता आणि त्यावेळी भाजपबरोबर असणाऱ्या चंदन मित्रा यांचा समावेश होता.

नेहमीची एक तक्रार अशी असते की, जेएनयूमधील डाव्यांनी उजव्या विचारसरणीच्या विचारवंतांना प्रवेश दिला नाही. तसेच प्रगती करण्याची संधी दिली नाही. या तक्रारीत तथ्य आहे, असे काही वेळासाठी मान्य केले तरीही, गंभीर शैक्षणिक युक्तिवादाची मांडणी करु शकणारे किंवा राष्ट्रवाद, मुक्त बाजारपेठ, हवामान बदल आणि मोदींसारख्या सशक्त नेत्यांच्या गुणांबाबतच्या समस्यांवर डाव्या उदारमतवादी जेएनयूला आव्हान देऊ शकणारे उजव्या विचारसरणीचे विचारवंत आहेत तरी कोठे? मात्र, भारतीय जनता पक्षाला बुद्धीवादाचेच वावडे आहे असे दिसते.

यामुळेच, पुढच्या स्तरावर जाऊन जेएनयूवर राजकीय स्वरुपाचे हल्ले होतात. यामध्ये विरोधाभास हा आहे की, एकीकडे जेएनयुमधील बुद्धीवादाविषयी तिरस्कार आहे. तर दुसरीकडे, येथे शिकवण्याबाबत तसेच शिकण्याबाबत अजिबात गांभीर्य नसल्याचा हास्यास्पद दावा केला जात आहे.

विद्यमान सरकारच्या मनात जेएनयूविषयी असलेला तिढ्यावरुन विद्यापीठ नक्कीच काहीतरी चांगले करीत आहे, असे सूचित होते. गेल्या चार वर्षांपासून जेएनयूवर कठोर अत्याचार होत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. मामिदाला जगदीश कुमार यांचा कार्यकाळदेखील याचदरम्यान सुरु झाला. आता या अत्याचारांनी क्रौर्य स्वरुप धारण केले आहे.

विद्यापीठात गेल्या 70 दिवसांपासून दैनंदिन शैक्षणिक उपक्रम बंद आहेत. कुलगुरुंनी हा पेचप्रसंग सोडविण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. उच्च शिक्षण सचिव आर.सुब्रमण्यम यांच्या मध्यस्थीने मागील डिसेंबर महिन्यात ही समस्या सहजपणे सुटण्याची चिन्हे होती. कारण, सुब्रमण्यम हे स्वतः जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत. मात्र, याबाबतचा तोडगा दृष्टीपथात असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

जेएनयूच्या कुलगुरुंना त्यांच्या संपुर्ण कार्यकाळात कोणतेही नैतिक अधिकार नव्हते. मात्र, विद्यापीठातील हिंसाचार पाहता त्यांची विश्वासार्हता किती खालच्या थराला जाऊ शकते याने एखादी व्यक्ती विचारात पडेल. विद्यापीठाच्या आवारात हिंसाचार झाल्यानंतर संपुर्ण दोन दिवस त्यांनी मौन राखल्याबद्दल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

यानंतर, दीपिका पदुकोणच्या विद्यापीठ भेटीबाबत महान व्यक्तिमत्त्वांसंदर्भातील त्यांनी मारलेला टोमणा त्यांच्याबाबत आणि त्यांच्या प्राधान्यक्रमाबाबत बरेच काही सांगून जातो. त्याच्याकडून नैतिक कारणास्तव राजीनाम्याची अपेक्षा करणे अतिशयोक्ती ठरेल.

कुलगुरूंच्या टीकाकारांच्या मते, त्यांना विद्यापीठाचा कारभार चालविण्यापेक्षा तो रसतळाला नेण्यात अधिक रस आहे. मात्र, सध्या ते विद्यापीठातील ऑजियन स्टेबल्सची सफाई करण्यात व्यस्त आहेत, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे.

मात्र, एखाद्याला याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण विविध माध्यमांमधील बातम्या पाहिल्या असता, त्यांच्या देखरेखीखाली सुरु असलेल्या प्राध्यापक भरतीचा दर्जा धक्कादायक आहे. विद्यापीठातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरुंची सर्वात विचित्र कृती म्हणजे, मागील सत्रातील परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना इमेलवरुन प्रश्न पाठवून घेण्याचे ठरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपली उत्तरे इ-मेल किंवा व्हॉटसअॅपवरुन लिहून पाठवणे अपेक्षित होते. मात्र सुदैवाने शिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या हास्यास्पद प्रकाराला विरोध केला.

अखेर, या सर्व सुरु असलेल्या दीर्घकालीन कथेतील सर्वात वाईट भाग म्हणजे टुकडे टुकडे गँग या नव्या संज्ञेची निर्मिती. जेएनयूबरोबर ही संज्ञा जोडली जाण्यात अर्णब गोस्वामी हा अतिशय दंगेखोर आणि आक्रमक दूरदर्शन सुत्रसंचालक कारणीभूत आहे. आणि याच संज्ञेमुळे विद्यापीठाविरोधातील अर्थहीन द्वेष वाढीस लागला आहे. जेएनयूच्या कुलुगुरुंनी विद्यापीठाच्या निराधार निंदेला कोणताही प्रतिकार केलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details