चेन्नई -जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यासाठी मोदींनी ज्या मार्गाचा अवलंब केला. त्या मार्गाचे मी कौतुक केले, असे स्पष्टीकरण अभिनेता रजनीकांत यांनी आज दिले आहे. काश्मीर प्रकरण हे देशाच्या सुरक्षेशी संबधीत आहे. त्यामुळे कोणत्या मुद्याचे राजकारण करावे आणि कोणत्या नाही यामधील अंतर समझून घ्यावे, असे आवाहन त्यांनी नेत्यांना केले.
मोदी आणि शाह यांनी कश्मीर मुद्यावर कुटनीतीचा वापर करत कलम 370 रद्द केले. एकाने योजना केली आणि दुसऱ्यांने ती पार पाडली. त्यामुळे मी त्यांना कृष्ण-अर्जुनासारखी जोडी म्हटले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
मोदी सरकारने काश्मीरप्रश्नी ज्या पद्धतीने योजना आखली. ती 'मास्टर रणनीती' होती. त्यांनी प्रथम कलम काश्मीरमध्ये कलम 144 लागू केले. त्यानंतर काश्मीरमध्ये कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खातरजमा केली. त्यानंतर बहुमत नसलेल्या राज्यसभेत विधेयक मांडले. तिथे मंजुर झाल्यानंतर लगेचेच लोकसभेत मंजूर करून घेतले, असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात रजनीकांत बोलत होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची जोडी कृष्ण-अर्जुनासारखी असल्याचे वक्तव्य अभिनेता रजनीकांत यांनी केले होते. तसेच अमित शाह यांना मिशन काश्मीरसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या होत्या. कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीमधील दहशतवाद संपेल. तसेच जम्मू काश्मीर विकासाच्या दिशेने माग्रक्रमण करेल असेही रजनीकांत म्हणाले होते.