महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेस नेत्याचे मोदींना पत्र; 'स्थलांतरित कामगारांना घरी पोहचवण्याची केली विनंती - कोरोना

काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी किंवा जवळच्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती चौधरी यांनी पत्रामध्ये केली आहे.

अधीर रंजन चौधरी
अधीर रंजन चौधरी

By

Published : Apr 11, 2020, 11:22 AM IST

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशामध्ये 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी किंवा जवळच्या ठिकाणी नेण्याची व्यवस्था करावी. जेथून ते आपापल्या राज्यात सुरक्षितपणे परतील याची सुनिश्चता राज्य सरकार करेल, अशी विनंती चौधरी यांनी पत्रामध्ये केली आहे.

देशातील विविध भागातील अडकलेल्या मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. जेवण, राहण्याची व्यवस्था, कपडे, आरोग्यसेवा तसेच अनिश्चिततेचा सामना मजूर करत आहेत. या गोष्टीबद्दल तुम्ही माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे परिचित आहात. त्यामुळे हे कामगार घरी पोहचतील अशी सुविधा करावी, असे चौधरी म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची मुदत १४ एप्रिलपर्यंत आहे. हा लॉकडाऊन उठवायचा, सुरू ठेवायचा की, शिथील करायचा याबाबत आज निर्णय होणार आहे. बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याच्या कल्पनेला सहमती दर्शवली आहे. तसेच, ओडिशाने आणि पंजाबने लॉकडाऊन वाढवले देखील आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details