नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे मोबाईल आधारीत अॅप विकसित केले आहे. हे अॅप सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.
आरोग्य सेतू अॅप सरकारी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक - Private sector
संबधित विभागाचे १०० टक्के कर्मचारी आरोग्य सेतू अॅप वापरत आहेत का? ही जबाबदारी कंपनीतील अधिकाऱ्यांची आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेला भाग म्हणजे कंन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हे अॅप वापरावे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे. संबधित विभागाचे १०० टक्के कर्मचारी आरोग्य सेतू अॅप वापरत आहेत का? ही जबाबदारी कंपनीतील अधिकाऱ्यांची आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
आरोग्य सेतू अॅप तुम्हाला कोरोनाचा धोका किती आहे, हे सांगते. तसेच तुमच्या परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण किंवा संभाव्य रुग्ण किती आहेत. याची माहिती देते. मोबाईलच्या ब्ल्यूटुथद्वारे हे अॅप काम करते. देशामध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ४ मे पासून पुन्हा २ आठवड्यांसाठी संचारबंदी वाढविण्यात आली आहे.