महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा लष्कराने केला जप्त, दहशतवाद्यांना दणका

लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने पूंछ जिल्ह्यातील सूरनमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली होती. विविध ठिकाणी तपासणी केल्यानंतर या पथकाच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला आहे.

जम्मू काश्मीर
जम्मू काश्मीर

By

Published : Oct 4, 2020, 6:23 PM IST

श्रीनगर -जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये लष्कर आणि पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या शस्त्रांमध्ये एके-47 राइफलसह इतर दारूगोळा ताब्यात घेतला आहे.

लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने पूंछ जिल्ह्यातील सूरनमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवली होती. विविध ठिकाणी तपासणी केल्यानंतर या पथकाच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दारूगोळ्यासह एके-47 राइफली, तीन मॅक्झीन आणि पिस्तुलाचा समावेश आहे.

विशेष पथकाला सूरनमध्ये दहशतवाद्यांची ठिकाणे असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यावरून लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. मोठा शस्त्रसाठा सापडल्याने दहशतवाद्यांचा घातपाताचा डाव उधळून लावला गेला आहे.

हेही वाचा -हाथरस प्रकरण : आरोपींचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीच्या बक्षिसाची घोषणा, काँग्रेस नेत्यास अटक

ABOUT THE AUTHOR

...view details