श्रीनगर -जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यादरम्यान चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान लष्कराच्या एका जवानास वीरमरण आले आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 1 दहशतवादी ठार, तर भारताचा एक जवान हुतात्मा - दोडा जिल्ह्यात चकमक
जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यादरम्यान चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
Army personnel
डोडा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील ही दुसरी चकमक आहे. यापूर्वी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या जिल्हा कमांडर हारुण अब्बास याला 15 जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी ठार केले होते.