महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मूतील सैन्याने सुरू केली वृक्षारोपण मोहीम

जम्मूमधील वन विभागाच्या डोमाना व मार्च तहसील येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

जम्मूतील सैन्याने सुरू केली वृक्षारोपण मोहीम

By

Published : Jul 28, 2019, 8:35 PM IST

श्रीनगर- जम्मूतील सैनिकांनी 'ग्रीन अर्थ - क्लीन अर्थ' मोहिमेद्वारे वृक्षारोपणाची एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानिक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी केल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्यांनी रविवारी दिली.

जम्मूमधील वन विभागाच्या डोमाना व मार्च तहसील येथून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ७ दिवसांच्या या मोहिमेत १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये ५ हजार सावली देणारी झाडे, ३ हजार फळ झाडे आणि इतर विविध प्रकारच्या २ हजार झाडांचा समावेश आहे.

ज्या व्यक्तीने रोपाची लागवड केली आहे त्याच व्यक्तीकडे त्या रोपाची मालकी देण्यात आली आहे. त्या व्यक्तीवर रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी असणार आहे. वृक्षारोपण केलेली ही रोपे जगवण्यासाठी, असा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details