महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीर : गेल्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान, 1 जवान हुतात्मा - Army killed nine terrorists

भारतीय सुरक्षा दलाने गेल्या 24 तासांत काश्मीर खोऱयात तब्बल 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Jammu and Kashmir: Army killed nine terrorists
Jammu and Kashmir: Army killed nine terrorists

By

Published : Apr 5, 2020, 11:59 AM IST

Updated : Apr 5, 2020, 12:33 PM IST

श्रीनगर - भारतीय सुरक्षा दलाने गेल्या 24 तासांत काश्मीर खोऱयात तब्बल 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे. शनिवारी दक्षिण काश्मीरमधील बाटपुरा येथे सुरक्षादलाने 4 दहशतवाद्यांना ठार केले होते. तसेच सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळील केरन सेक्टरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात तीन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात या तिघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या गावामध्ये अजूनही काही दहशतवादी लपले असून, लष्कराची शोधमोहिम सुरु आहे.

Last Updated : Apr 5, 2020, 12:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details