सिकंदराबाद - परतीच्या पावसाने तेलंगणा राज्यातील हैदराबादसह सिकंदाराबद शहराला झोडपले आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागगिरक अडकून पडले होते. नागरिकांना दिलासा देण्याकरता तेलंगणा सरकारच्या बचाव मोहिमेत एनडीआरएफच्या जवानांनीही सहभाग घेतला आहे.
तेलंगणात पुरबाधितांकरता सरकारच्या बचाव मोहिमेत जवानही सामील - Rescue and relief operations
तेलंगणा सरकारने केलेल्या मदतीसाठी एनडीआरएफचे बचाव पथक कार्यरत झाले आहे. या पथकाने २२ जणांना वाचविले आहे. तर १ हजार १६५ जणांना सुरक्षितस्थळी नेले आहे.
मुसळधार पावसाने हैदराबादमधील जनजीवन विस्कळित झाले आहे. सैन्याने बंडलगौडा येथे बचाव मोहिम सुरू केली आहे. विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. सैन्याच्या वैद्यकीय पथकाकडून जीवनावश्यक वस्तुंची मदतही अडकून पडलेल्या नागरिकांना देण्यात येत आहे. यामध्ये प्रथमोपाराही समावेश आहे.
तेलंगणा सरकारने केलेल्या मदतीसाठी सैन्याचे बचाव पथक कार्यरत झाले आहे. या पथकाने २२ जणांना वाचविले आहे. तर १ हजार १६५ जणांना सुरक्षितस्थळी नेले आहे. एनडीआरएफचे व्यवस्थापकीय संचालक सत्यनारायण प्रधान म्हणाले, की आम्ही सतत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहोत. संबंधित स्थानिक यंत्रणा आणि इतर भागीदारांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.