कोलकाता - भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडच्या ९ वर्षांच्या श्वानाचा मृत्यू झाला. या 'डच' नावाच्या श्वानाला जवानांनी आदरांजली वाहिली. ११ सप्टेंबरला या श्वानाचा मृत्यू झाला होता. त्याने लष्कराला अनेक कारवायांदरम्यान दहशतवाद्यांनी पेरलेली स्फोटके शोधण्यात विशेषतः आयईडी बॉम्ब शोधून काढण्यात मदत केली होती. सर्व अधिकाऱ्यांनी या श्वानाच्या मृतदेहाला फुलांनी सजवले होते. सर्वांनी त्याला अखेरचा सलाम केला.
'त्याच्या' देशसेवेला सलाम! लष्कराच्या श्वानाचा मृत्यू, जवानांकडून आदरांजली
भारतीय लष्कराकडील 'डच' या श्वानाला मृत्यूनंतर आदरांजली वाहण्यात आली. तो ९ वर्षांचा होता. त्याने लष्कराच्या अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. याच्या देशसेवेमुळे तो संपूर्ण देशासाठी 'हिरो' ठरला आहे. त्याला सलाम!
या श्वानाच्या मृत्यूनंतर ईस्टर्न कमांडने ट्विट करत याविषयी माहिती दिली. लष्कराच्या जवानांनी या श्वानाला फुले वाहून स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. 'भारतीय लष्कराकडील 'डच' या श्वानाला मृत्यूनंतर आदरांजली वाहण्यात आली. तो ९ वर्षांचा होता. त्याने लष्कराच्या अनेक कारवायांमध्ये भाग घेतला. त्याचे अनेक आयईडी बॉम्ब शोधून काढण्यात तसेच, सीआय/ सीटी ऑपरेशन्समध्ये कौशल्य होते. त्याच्या देशसेवेमुळे तो संपूर्ण देशासाठी 'हिरो' ठरला आहे. त्याला सलाम!' असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - 'फाळणी' ही आधुनिक भारतातील सर्वांत मोठी चूक - जितेंद्र सिंह