महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

संसदेने आदेश दिल्यास पीओके आपलाच - लष्करप्रमुख मनोज नरवणे

आम्ही अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आधार घेत नाही. अशा घटनांना हाताळण्यासाठी आम्ही सैन्याचा वापर करतो, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबाबत ते बोलत होते.

लष्करप्रमुख मनोज नरवणे
लष्करप्रमुख मनोज नरवणे

By

Published : Jan 11, 2020, 3:31 PM IST

नवी दिल्ली - संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे, असा संसदीय संकल्प आपण केलेला आहे. तसेच संसदेला पीओके हवा असेल तर तो देखील आपलाच होईल. याबाबत संसदेने आदेश दिल्यानंतर योग्य कारवाई करू, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले. त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

आम्ही अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आधार घेत नाही. अशा घटनांना हाताळण्यासाठी आम्ही सैन्याचा वापर करतो, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबाबत ते बोलत होते.

लष्कारामध्ये सहभागी होण्यासाठी १०० महिलांची पहिली बॅच तयार आहे. त्यांना ६ जानेवारीपासून प्रशिक्षण देणे सुरू झाले आहे.

सियाचीन अत्यंत महत्त्वाचे -
सियाचीन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याठिकाणी एक संघटना पश्चिम आणि उत्तर मोर्चांची देखरेख करीत आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्काराच्या काही अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी आल्या होत्या. मात्र, त्या निराधार असल्याचे समोर आले आहे, असेही लष्करप्रमुख नरवणे म्हणाले.

लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे २८ वे लष्करप्रमुख ठरले आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) निवड करण्यात आली असून ते लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले आहेत. जनरल बिपिन रावत यांच्या जागी लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी लष्करात ३७ वर्ष सेवा बजावली. तसेच त्यांनी विविध पदांवर देखील काम केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details