महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

नियंत्रण रेषेवर कधीही बिघडू शकते परिस्थिती, आम्ही तयार - लष्करप्रमुख बिपिन रावत

केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी मागील महिन्यात लोकसभेत पाकिस्ताने जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांच्या घटनांची माहिती दिली होती. ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान पाकिस्तानने तब्बल 950 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

लष्करप्रमुख बिपिन रावत
लष्करप्रमुख बिपिन रावत

By

Published : Dec 18, 2019, 9:40 PM IST

नवी दिल्ली - 'नियंत्रण रेषेवरील स्थिती कोणत्याही क्षणी बिघडू शकते. आपल्याला कारवाईसाठी तयार राहिले पाहिजे,' असे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे.

लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, ज्या वेळी पाकिस्तान नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 आणि आर्टिकल ३५ ए भारतीय संसदेने रद्द केले होते. यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

लष्करप्रमुख रावत यांनी, 'नियंत्रण रेषेवरील स्थिती केव्हाही बिघडू शकते. आपल्याला कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार रहावे लागेल,' असे म्हटले आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांनी मागील महिन्यात लोकसभेत पाकिस्ताने जम्मू आणि काश्मीरमध्ये केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनांच्या घटनांची माहिती दिली होती. ऑगस्ट 2019 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान पाकिस्तानने तब्बल 950 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details