बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य युद्धासाठी तयार होते - लष्करप्रमुख - army operations
'भारतीय सैन्य पाकिस्तानसह पारंपरिक युद्धासाठी तयार होते. आवश्यकता पडल्यास पाकिस्तानच्या सीमेवर आक्रमण करण्याचीही तयारी ठेवली होती.' पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार हवाई हल्ल्यासह विविध पर्यायांवर विचार करत होते. तेव्हा सेना प्रमुखांनी सरकारला त्यांच्या तयारीविषयी सांगितले होते,' असे रावत म्हणाले.
नवी दिल्ली - भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान त्यांनी 'बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारतीय सैन्य पाकिस्तानशी दोन हात करायला तयार होते, अशी माहिती दिली. याशिवाय, सैन्यातील भ्रष्टाचाराविषयीही त्यांनी मोठे विधान केले.
'बालाकोट एअर स्ट्राइकनंतर भारताची तीनही सेनादले पाकिस्तानशी युद्धाला तयार असल्याचे सरकारला कळवण्यात आले होते,' असेही रावत म्हणाले. 'सैन्य निवास योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर भ्रष्ट अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्यात येत आहे,' असे ते म्हणाले. त्यांनी सैन्य अधिकारी आणि जवानांना इंटरनेटच्या वापराविषयी सावधगिरीचा इशारा दिला.
'भारतीय सैन्य पाकिस्तानसह पारंपरिक युद्धासाठी तयार होते. आवश्यकता पडल्यास पाकिस्तानच्या सीमेवर आक्रमण करण्याचीही तयारी ठेवली होती.' पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सरकार हवाई हल्ल्यासह विविध पर्यायांवर विचार करत होते. तेव्हा सेना प्रमुखांनी सरकारला त्यांच्या तयारीविषयी सांगितले होते,' असे रावत म्हणाले.
सूत्रांच्या माहितीनुसार, जनरल रावत यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सैन्याधिकाऱ्यांशी बंद खोलीत संवाद साधला. 'बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याद्वारे कोणत्याही प्रकारे आक्रमक प्रतिक्रिया आली असती, तर त्याचा मुकाबला करण्यास सैन्य तयार होते,' असे लष्करप्रमुख म्हणाले. जनरल रावत यांच्या टिप्पणीवर बोलताना एका सेना अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय सेना हे युद्ध पाकच्या भूमीवर घेऊन जाऊ शकत होती, असे जनरल रावत सांगू इच्छित होते.