महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन सीमावाद : लडाखमध्ये चीनला टक्कर देण्यासाठी लष्कराची रणनिती

भारत चीन सीमावाद अनेक दिवसांपासून पेटलेला आहे. आता हिवाळ्याच्या तोंडावर लष्कराकडून युद्धाची तयारी सुरू आहे. त्यासाठी लष्कराने सर्व साधन-सामुग्रीची जुळवाजुळव सुरू केली आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र

By

Published : Oct 4, 2020, 7:47 PM IST

लेह -पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवर मे महिन्यापासून तणावपूर्ण वातावरण आहे. लडाखमधील भारतीय हद्दीत चिनी लष्कराने अतिक्रमण केले असून भारतानेही प्रत्युत्तर म्हणून मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता हिवाळ्याच्या तोंडावर भारतीय लष्कर चीनचा सामना करण्यासाठी जोरदार तयारीला लागले आहे. भारतीय लष्कराने सीमेवर रणनिती आखल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दोन्ही देशांत युद्धाची वेळ आली तर त्या दृष्टीने सर्व संसाधंनांची जुळवाजुळव लष्कराकडून सुरू आहे.

भारतीय लष्कराने सीमेवर रणगाडे, क्षेपणास्त्रे, तोफा, विमाने, लष्करी मोबाईल व्हेईकल यासह सर्व शस्त्रसामुग्री तैनात केली आहे. जर लेह विमानतळावर तुम्ही नजर टाकली तर एअर फोर्सची सी-१७, इलियुशीन-७६, सी-१३० सुपर हर्क्युलिस विमाने पहायला मिळतील. सीमाभागात तैनात असलेल्या लष्कराला आवश्यक तो रसद पुरवठा करण्यात आला आहे. हिवाळ्याच्या सुरुवातील लष्कराकडून ही तयारी सुरू आहे. काही मीटर अंतरावर दोन्ही देशांचे सैन्य येऊन थांबले आहे.

लडाख सीमेवर लष्कर आणि सुरक्षा दलांना लागणारे सर्व साहित्य वेळेत उपलब्ध व्हायला हवे, असे आदेश लष्करी मुख्यालयाकडून दिले गेल्याचे सीमेवर तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सीमेवरील मोक्याच्या ठिकाणांवर भारतीय लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनने सीमेवरील प्योंगयांग त्सो भागात अतिक्रमण केले असून तेथून मागे जाण्यास नकार दिला आहे. मात्र, भारतानेही सीमेवरील इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर कब्जा करून आघाडी मिळवली आहे.

सीमाभागातील फॉर्वर्ड पोस्टवर तैनात असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांत सीमेवरील रणनितीबाबत अनेक वेळा बैठका झाल्या आहेत. याचा सीमेवरील लष्कराच्या तयारीला मोठा फायदा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details