भोपाळ- मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर शहर मराठी भाषकांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, येथील मराठी भाषा आणि संस्कृती लोप पावत चालली आहे. मराठी संस्कृतीला पुनर्जिवीत करण्याचा प्रयत्न ग्वाल्हेरमधील काही मराठी कलाकार करत आहेत. "अप्सरा आली" हा लावण्यांचा कार्यक्रम १८ ऑगस्टला शहरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनी देश-विदेशामध्येही लावण्यांचे कार्यक्रम केलेले आहेत.
ग्वाल्हेर शहरातील दाल बाजार भागातील नाट्य मंदिरात हा लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये मराठी संस्कृतीवर आधारित २५ गाण्यांचे सादरीकरण होणार आहे. हिंदी भाषिकांचा विचार करुन कार्यक्रमामध्ये हिंदी गाणेही सादर होणार आहेत. मात्र, हिंदी गाणे मराठी संस्कृतीवर आधारित असतील. अडीच तास हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.