नवी दिल्ली - देशभरामध्ये आत्तापर्यंत 47 हजार 951 नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात आल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) दिली आहे. देशामध्ये आतापर्यंत 126 सरकारी तपासणी केंद्रे आहेत, तर 51 खासगी केंद्रांना परवानगी देण्यात आल्याचेही आयसीएमआरचे प्रमुख आर. गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
देशभरात सुमारे 50 हजार नागरिकांची कोरोना चाचणी - आयसीएमआर - कोरोना टेस्ट
देशामध्ये आत्तापर्यंत 126 सरकारी तपासणी केंद्रे आहेत, तर 51 खासगी केंद्रांना परवानगी देण्यात आल्याची आयसीएमआने दिली आहे.
आयसीएमआर पत्रकार परिषद
भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे 1466 संशयित आढळून आले आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी घेण्यास आयसीएमआरने नकार दिला आहे. त्याएवजी फक्त लक्षणे असणाऱ्यांचीच कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. कोरोनाचा सामाजिक प्रसार झाला नसल्याचे म्हणणे आयसीएमआरचे आहे. कोरोनाची बाधा झालेले 132 रुग्ण पुर्णत: बरे झाले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला आहे.