महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दोन दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ट्रक ड्रायव्हर जागीच ठार; एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती - काश्मीर ट्रक ड्रायव्हर हल्ला

दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे, तर त्याचा सहकारी आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेच्या मालकाला देखील मारहाण केली आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.

Truck driver shot by terrorist

By

Published : Oct 14, 2019, 10:59 PM IST

श्रीनगर : दक्षिण काश्मीर प्रदेशात शिरमल येथे सफरचंदाच्या ट्रकवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला आहे, तर त्याचा सहकारी आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. दहशतवाद्यांनी सफरचंदाच्या बागेच्या मालकाला देखील मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक राजस्थानचा आहे. तर मृत चालकाचे नाव शरीफ खान आहे. दहशतवाद्यांनी या हल्ल्यानंतर ट्रकदेखील पेटवून दिला आहे. या दोन दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच युद्धपातळीवर दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details