महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारींच्या मुलाच्या हत्येप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक - माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी

या हत्येप्रकरणी गेले काही दिवस अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. काही दिवसांपूर्वी रोहितची आई उज्जवला यांनी अपूर्वावर आरोप केले होते.

रोहित शेखर

By

Published : Apr 24, 2019, 11:30 AM IST

Updated : Apr 24, 2019, 6:38 PM IST

नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी रोहितची पत्नी अपूर्वाला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्येप्रकरणी गेले काही दिवस अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.

काही दिवसांपूर्वी रोहितची आई उज्जवला यांनी अपूर्वावर आरोप केले होते. अपूर्वा हिचे विवाहापूर्वी अनैतिक संबंध होते आणि संपत्तीसाठी ती रोहितला वारंवार त्रास देत होती. यातून दोघांमध्ये खटके उडत होते. दोघांतील सततच्या भांडणामुळे त्यांचे संबंध घटस्फोटापर्यंत ताणले होते. अपूर्वा आणि तिचे कुटुंबीय पैशासाठी भूकेले आहे आणि ते त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, असे त्या म्हणत होत्या.

Last Updated : Apr 24, 2019, 6:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details