महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'अपाचे'ने हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ - हवाईदल प्रमुख बी.एस.धानोआ - अपाचे चॉपर

याआधी हवाई दलातील रशियन बनावटीची एमआय-३५ चॉपर्स कालबाह्य होत आहेत. त्यांची जागा आता अपाचे हेलिकॉप्टर्स घेतील. ही हेलिकॉप्टर्स वेगवेगळ्या मोहिमांसाठी उपयुक्त असून, जगातील अनेक देश यांचा वापर करत आहेत,' असे धानोआ म्हणाले.

बी. एस. धानोआ

By

Published : Sep 3, 2019, 1:48 PM IST

Updated : Sep 4, 2019, 2:56 PM IST

पठाणकोट -एअर चीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी अपाचे चॉपरचा हवाई दलाच्या ताफ्यात समावेश झाल्यामुळे हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ झाल्याचे म्हटले आहे. धानोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट येथे अपाचे चॉपर हावई दलात अधिकृतरीत्या दाखल झाले आहेत.

बी. एस. धानोआ

हेही वाचा -खोटे बोलण्यासाठी कुलभूषण यांच्यावर पाककडून दबाव, भारताचा आरोप

'याआधी हवाई दलात असलेली रशियन बनावटीची एमआय - ३५ ही चॉपर्स वापरण्यायोग्य कालावधीबाहेर चालली आहेत. त्यांची जागा आता अपाचे हेलिकॉप्टर्स घेतील. ही हेलिकॉप्टर्स वेगवेगळ्या मोहिमांसाठी उपयुक्त असून, जगातील अनेक देश यांचा वापर करत आहेत,' असे धानोआ म्हणाले.

'हे हेलिकॉप्टर अत्यंत चांगल्या क्षमतेने मारा करू शकते. ८० च्या दशकापासून याचा जगभरात प्रत्यय आला आहे. याच्या समावेशाने हवाई दलात अत्याधुनिक यंत्रणेचा समावेश झाला आहे. हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रांचा तसेच, दारूगोळ्याचाही मारा करू शकते. याची १२०० राऊंड्स फायर करण्याची क्षमता आहे,' असे धानोआ म्हणाले. आताच्या इतर हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत ते अद्ययावत करण्यात आले आहे.

हेही वाचा - ८ अपाचे अटॅक चॉपर हवाई दलात दाखल, एअर चीफ मार्शल धानोआ उपस्थित

Last Updated : Sep 4, 2019, 2:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details