नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील हाथरस बलात्कार प्रकरणावरून देशभरामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांनी हाथरस प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतले आहे. आज त्यांनी हाथरमध्ये जाऊन आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महासभेचे सदस्य मनवेंद्र सिंगही होते. केस संबधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
वकिल ए. पी. सिंह यांनी घेतली हाथरस प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबीयांची भेट - वकिल ए. पी. सिंह
निर्भया प्रकरणातील दोषींचे वकिल ए. पी. सिंह यांनी हाथरस प्रकरणातील आरोपींचे वकीलपत्र घेतले आहे. आज त्यांनी हाथरमध्ये जाऊन आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
मी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पूर्ण फिस घेतो. माझी फिस आरोपींच्या वतीने राष्ट्रीय महासभा भरणार आहे. चारही जणांनी कोणताही बलात्कार केला नसून त्यांना फसवण्यात येत आहे. या प्रकरणात राजकारण करण्यात येत असून एससी आणि एसटी कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. मी चौघांनाही न्याय मिळवून देणार, असे ए. पी. सिंह म्हणाले.
तथापि, यापूर्वी वकील ए. पी. सिंह यांनी हाथरस प्रकरण बलात्काराचे नसून ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचा दावा केला होता. दरम्यान, संदीप, लव-कुश, रवी आणि रामू या चार आरोपींनी आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. पीडितेच्या आई आणि भावानेच तिला मारहाण केली. त्यात तिला गंभीर जखमा झाल्या आणि नंतर तिचा मृत्यू झाला. असे या आरोपींनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणात आपल्याला आणि आपल्या मित्रांना अडकवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.