महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आपत्तीतही मोदी सरकार गरिबांकडून पैसे कमवत आहे' - पंतप्रधान नरेंद्र मोदी

लॉकडाऊन दरम्यान श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 428 कोटी कमवल्याचा रिपोर्टवरून राहुल गांधींनी मोदींवर हल्ला चढवला आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी

By

Published : Jul 25, 2020, 12:36 PM IST

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस खासदार राहुल गांधी हे भारत- चीन संघर्ष, देशातील बेरोजरागी आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेवरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. आजही त्यांनी लॉकडाऊन दरम्यान श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून केंद्र सरकारने 428 कोटी कमवल्याचा रिपोर्टवरून मोदींवर हल्ला चढवला आहे.

देशावर साथीचे मोठे संकट पसरले असून लोक अडचणींत आहेत. मात्र, या आपत्तीचे संधीत रुपांतर करून गरीब विरोधी सरकार नफा कमवत आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.

लॉकडाऊन काळात देशभरामध्ये अडकेलेल्या स्थलांतरीत मजूर कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी सरकारने विशेष श्रमिक रेल्वे चालवली होती. त्यासाठी केंद्र सरकारने 2,142 कोटी रुपये खर्च केले होते. त्यातून सरकारला 428 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

कार्यकर्ते अजय बोस यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाद्वारे मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, 29 जूनपर्यंत रेल्वेने 428 कोटी रुपये कमावले. लॉकडाऊनमध्ये 4,615 गाड्या चालविण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त, जुलैमध्ये 13 गाड्या चालवून सुमारे 1 कोटी रुपये कमावले.

ABOUT THE AUTHOR

...view details