महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर तामिळनाडूत सीएए विरोधी आंदोलन पेटले - washermanpet protest news

आज शहरातील अनेक भागात दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच सहआयुक्त विजयकुमारी, एक पोलीस निरीक्षक आणि दोन शिपाई असे एकूण चार जण आंदोलनात जखमी झाले आहेत.

washermanpet  protets
वाशीरामनपेठ आंदोलन

By

Published : Feb 15, 2020, 4:39 PM IST

चेन्नई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात तामिळनाडूतील अनेक भागात आज(शनिवारी) आंदोलन पेटले आहे. शुक्रवारी चेन्नई शहराजवळील वाशीरामनपेठ या भागात आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर आज राज्यात आंदोलन पसरले आहे. काल झालेल्या आंदोलनात अनेकजण जखमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी १०० जणांना ताब्यातही घेतले आहे.

आज शहरातील अनेक भागात दुकाने बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच सहआयुक्त विजयकुमारी, एक पोलीस निरीक्षक आणि दोन शिपाई असे एकूण चार जण आंदोलनात जखमी झाले आहेत. शुक्रवारी शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केला, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.

चेन्नई शहराबरोबरच राज्यातील इतर शहरांमध्येही आंदोलन पसरले आहे. तिरुचेंदूर येथेही आंदोलन पसरल्याची माहिती मिळत आहे. आंदोलकांनी चिदंबरम-तिरची महामार्गावर रास्ता रोको आंदोलनही सुरू केले आहे. चेन्नईचे पोलीस आयुक्त ए. के. विश्वनाथन यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांची भेट घेऊन वाशीरामनपेठ येथे झालेल्या आंदोलनाची माहिती दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details