9.30 PM : अलीगढमधील पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर, अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
9.00 PM : लष्कराच्या गणवेशाशी मिळता-जुळता गणवेश वापरल्यामुळे, भारतीय लष्कर करणार दिल्लीमधील पोलीस आणि खासगी सुरक्षा संस्थेविरोधात कारवाई करणार आहे.
7.48 PM : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलीगढमधील इंटरनेट सेवा आज(रविवारी) मध्यरात्री १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
7.12 PM : जाफराबादमधील आंदोलनामध्ये भीम आर्मीचे कार्यकर्तेही सहभागी झाले आहेत. याठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
6.11 PM : अलीगढमधील सीएएविरोधी आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांदरम्यान दगडफेक झाली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यावेळी एका आंदोलकाला गोळी लागल्याची माहितीही समोर येत आहे.
अलीगढमधील आंदोलनादरम्यान आंदोलकाला लागली गोळी..
5.38 PM : दिल्लीतील लाल कुँआ परिसरात काही महिलांनी सीएए विरोधी आंदोलनास सुरुवात केली आहे. अनिश्चित काळासाठी आपण आंदोलन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाल कुँआ परिसरात अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरू..
5.18 PM : दिल्लीतील शाहीनबाग परिसरात सुरू असलेल्या सीएए विरोधी आंदोलकांविरोधात जसोला विहारच्या काही रहिवाशांनी आंदोलन सुरू केले आहे. शाहीनबागमधील आंदोलनामुळे रस्ता अडवला जात असल्याने. त्याविरोधात आपण हे आंदोलन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
5.10 PM :दिल्लीच्या मौजपूर परिसरात दोन गटांमध्ये दगडफेक झाली. सीएए विरोधी आणि सीएए समर्थनार्थ आलेल्या आंदोलकांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. कालपासून सीएएविरोधी आंदोलन सुरू असलेल्या जाफराबादपासून थोड्याच अंतरावर मौजपूर आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा केला.
नवी दिल्ली - ईशान्य दिल्लीतील जाफराबाद येथे काल (शनिवार) रात्रीपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात आंदोलनास सुरूवात झाली. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक मेट्रो स्टेशनखालील रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत.
सीएए विरोधात गेल्या ७० हून अधिक दिवसांपासून दिल्लीतील शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. यावेळी अडवण्यात आलेला दिल्लीतून नोएडा आणि फरिदाबादकडे जाणारा ९ नंबरचा रस्ता एका बाजूने खुला करण्यास आंदोलकांनी परवानगी दिली. शाहीनबागेतील आंदोलकांशी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन मध्यस्थींची नियुक्ती केली आहे. आंदोलन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती त्यांनी आंदोलकांना केली आहे. मात्र, अजून ही चर्चा यशस्वी झाली नाही.