रामगंजमंडी (कोटा) -अनेक वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्यानंतर वन्य जीवप्रेमींनी देखील कॅनायन डिस्टेंपर विषाणूच्या शंकेमुळे चौकशीची मागणी केली होती. त्यातच मुकुंदरा हिल्स टायगर रिजर्वमधील वाघिण एमटी-4 ची प्रकृती खराब झाली होती. त्यावेळी वनअधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली होती. मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या शरीरात कॅनायन डिस्टेंपर विषाणूच्या अँन्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंड असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे इतर वाघांच्या मृत्यूचे कारण कॅनायन डिस्टेंपर विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सूत्रांच्या माहितीप्रमाणे, वाघिणीच्या शरीरात जरी प्रतिपिंडे असली तरीही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वाघिणीला आता कुठलाही धोका नाही. या माहितीवरुन वाघांना आणि इतर प्राण्यांना सुरक्षित केले जाऊ शकते, असे वन्यजीव प्रेमींनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, विषाणूसंक्रमित प्राण्यांचे भक्षण केल्यानंतर वाघांनाही विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू कुत्री आणि इतर पाळीव प्राण्यांपासून वाघांपर्यंत पोहोचतो आहे. हा विषाणू वाघांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करुन मेंदूलाही नुकसान करतो.
पर्यावरणप्रेमी डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले आहे की, वाघांचा या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांना लस दिली जाईल. कॅनायन डिस्टेंपर विषाणू प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळतो, संक्रमित कुत्र्यांची शिकार वाघांनी केल्यास वाघदेखील संक्रमित होतात.