म्हैसूर - कर्नाटक राज्यातील म्हैसूरच्या अशोकपुरम रेल्वे स्थानकावरुन रविवारी आणखी एक विशेष श्रमिक रेल्वे परप्रांतीय मजुरांना घेऊन रविवारी बिहारला रवाना झाली. ही रेल्वे बिहारच्या पूर्णिया पर्यंत जाणार आहे.
आणखी एक श्रमिक रेल्वे म्हैसूरहुन परप्रांतीय प्रवाशांना घेऊन बिहारकडे मार्गस्थ - श्रमिक रेल्वे मैसुरहुन बिहारकडे रवाना
बिहार आणि कर्नाटकच्या राज्य सरकारांच्या आदेशानुसार रविवारी म्हैसूरच्या अशोकपुरम रेल्वे स्थानकावरुन बिहारला आणखी एक विशेष श्रमिक रेल्वे सोडण्द्वायात आली. या रेल्वेद्वारे जवळपास १ हजार १६५ परप्रांतीय प्रवासी असून त्यांना मंगळवारी बिहारच्या पुर्णिया स्थानकावर सोडण्यात येईल.
कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे देशभरात अडकून पडलेल्या परप्रांतीयाकरिता अखेर सरकारने परत पाठवण्याचे निर्देश दिले. यानंतर, शासनाच्या विशेष श्रमिक रेल्वे, बसने परप्रांतीय प्रवाशांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडून देण्यात येत आहे. रविवारी म्हैसूरच्या अशोकपुरम रेल्वे स्थानकावरुन बिहार राज्याकरता आणखी एक रेल्वे मजुरांना घेऊन रवाना झाली. ही रेल्वे बिहार व कर्नाटक या दोन्ही राज्य सरकारांच्या विनंतीवरून चालविण्यात आली. या रेल्वेत मंड्या, मद्दूर आणि हुसनार येथील मजुरांना आरोग्य तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवासाकरता परवानगी देण्यात आली. या रेल्वेमध्ये १ हजार १६५ परप्रांतीय प्रवासी असून त्यांना मंगळवारी बिहारच्या पूर्णिया रेल्वे स्थानकावर सोडण्यात येईल.
ही रेल्वे रविवारी सोडण्यात आली असून तत्पूर्वी मजुरांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सर्व टिकिट देण्यात आले. तसेच, प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे अनिवार्य असून आणि स्वच्छता राखण्यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आरपीएफची ६ पथक तैनात करण्यात आली होती.