महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीनदरम्यान आज होणार महत्वाची बैठक - भारत-चीन तणाव

सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा होईल.

भारत-चीन
भारत-चीन

By

Published : Jul 10, 2020, 9:12 AM IST

नवी दिल्ली - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी म्हणजे आज होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा होईल. दोन्ही देशादरम्यान झालेल्या करारानुसार बुधवारी पेट्रोलिंग पॉईंट 15 पासून चिनी सैन्य 2 किलोमीटर मागे सरकले आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवर संभाषण झाले असल्याची माहिती पराराष्ट्र मंत्रालायाने दिली आहे.

सीमेवर शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांनी पाऊल पुढे टाकवे. तसेच सीमा नियमांचे पालन करावे आणि सीमाभागातील शांती भंग होणार नाही, याची काळजी एकत्रितपणे घ्यावी, यावर दोन्ही देशांचं एकमत झालं आहे. या पूर्वी भारत आणि चीनदरम्यान चीनच्या मोलदो येथे आणि भारतातील चुशुल येथे चर्चा झाली होती.

पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला होता. या वेळी भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. या हिंसक संघर्षाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनचे सुमारे 40 सैनिक मारले गेले होते. भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जेथे जेथे तणाव निर्माण झालेला आहे, त्या सर्व ठिकाणांवरील तणाव कमी कसा करता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details