अलिगड (उत्तर प्रदेश) - हाथरसच्या बलात्कार प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट असताना आता याच गावातील आणखी एका ६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कारामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अलीगडच्या इगलासमध्ये राहणाऱ्या मावस भावाने तिच्यावर बलात्कार केला होता. उपचारासाठी तिला दिल्लीमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, दिल्लीतील एका रुग्णालयात तिचा आज (मंगळवार) मृत्यू झाला.
ही मुलगी मूळची हाथरस या गावची आहे. मात्र, गेल्या वर्षी आईचे निधन झाल्यामुळे ती तिच्या मावशीकडे राहण्यास गेली होती. काही दिवसांपूर्वी तिच्या मावस भावाने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेल्याने तिला दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा -हाथरस प्रकरण : मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट