महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'भाजपात येण्याचा निर्णय योग्य'...काँग्रेस आमदाराच्या पक्ष प्रवेशावर खासदार सिंधियांचं ट्विट - सुमित्रा देवी कासडेकर भाजप प्रवेश

सुमित्रा देवी कासडेकर यांचे मी भाजप पक्षात स्वागत करतो. आणखी एका आमदाराने राज्याच्या हिताचा विचार करता योग्य निर्णय घेतल्याचे ट्विट ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी केले.

ज्योतिरादित्य सिंधिया
ज्योतिरादित्य सिंधिया

By

Published : Jul 18, 2020, 5:10 PM IST

भोपाळ- काँग्रेस नेत्या आणि आमदार सुमित्रा देवी कासडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षामध्ये येण्याचा त्यांचा निर्णय राज्याच्या हितासाठी योग्य असल्याचे भाजप नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष सोडल्यापासून सिंधिया आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सतत शाब्दिक हल्ले सुरु आहेत.

काँग्रेस नेत्या सुमित्रा देवी कासडेकर यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजीमाना सूपुर्द केला. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या 15 पेक्षा जास्त आमदारांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे मध्यप्रदेशातली कमलनाथ सरकार कोसळले. तर भाजपची सत्ता आली.

सुमित्रा देवी कासडेकर यांचे मी भाजप पक्षात स्वागत करतो. आणखी एका आमदाराने राज्याच्या हिताचा विचार करता योग्य निर्णय घेतल्याचे ट्विट ज्योतिरादित्य सिंधिंया यांनी केले.

काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सुमित्रा देवी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. मध्यप्रदेश भाजपचे अध्यक्ष व्ही. डी शर्मा, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुमित्रा देवी यांना निर्णयावर पुनर्विचार करण्यास संधी दिली होती. मात्र, त्यानी राजीनाम्याचा निर्णय ठाम असल्याचे सांगितले असे, विधानसभेतील काँग्रेसचे प्रो-टेम नेते व्ही. डी. शर्मा यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details