धक्कादायक.! गेल्या तीन वर्षात रेल्वे अपघातात सुमारे ३२ हजार प्राण्यांचा बळी; ६६ हत्तींचाही समावेश
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जूनपर्यंत रेल्वेखाली येऊन २ हजार ४७९ प्राण्यांच्या मृत्यूची भर पडली आहे. तसेच या आकड्यांमध्ये हत्तींच्या मृत्यूचा समावेश नसून गेल्या तीन वर्षात तब्बल ६० हत्तींना रेल्वेच्या धडकेने जीव गमवावा लागला आहे. यामध्ये या वर्षात जूनपर्यंत ५ हत्ती दगावले आहेत.
नवी दिल्ली - अनेकदा रेल्वे अपघातामध्ये प्राण्यांचे बळी जातात. त्या बळींची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षात सुमारे ३२ हजार प्राण्यांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये भटक्या जनावरांसह सिंह, बिबट्या हत्तींसारख्या जंगली प्राण्यांचाही समावेश आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जूनपर्यंत रेल्वेखाली येऊन २ हजार ४७९ प्राण्यांच्या मृत्यूची भर पडली आहे. तसेच या आकड्यांमध्ये हत्तींच्या मृत्यूचा समावेश नसून गेल्या तीन वर्षात तब्बल ६० हत्तींना रेल्वेच्या धडकेने जीव गमवावा लागला आहे. यामध्ये या वर्षात जूनपर्यंत ५ हत्ती दगावले आहेत.
दुर्दैवी गेल्या तीन वर्षात म्हणजे २०१६ मध्ये तब्बल ७ हजार ९४५ जनावरे रेल्वेखाली चिरडली गेली. तर २०१७ आणि १८ या वर्षातील रेल्वेखाली येऊन मरणाऱ्या जनावरांची आकडेवारी तर मनाला सुन्न करणारी आहे. २०१७ मध्ये तब्बल ११ हजार ६८३ तर २०१८ मध्ये १२ हजार ६२५ जनावरांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे अपघाताच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण ३ ते ४हजार होते.
दरम्यान, अशा प्रकारे झालेल्या अपघातामध्ये रेल्वेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकतीच रेल्वेच्या सेवत दाखल झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसने देखील जनावरांना धडक दिल्याने त्या गाडीचा दर्शनी भाग खराब झाला होता.