महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उद्योगपती अनिल अंबानी दिवाळखोरीच्या मार्गावर; चीनी बँकांचे कर्ज फेडण्यास असमर्थ - Anil Ambani news

एकेकाळी जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत असलेले अनिल अंबानी यांच्या उद्योगांची बाजारातील पत आता शून्यावर आली आहे. अंबानी आता धनाढ्य नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.

अनिल अंबानी
अनिल अंबानी

By

Published : Feb 8, 2020, 8:43 AM IST

Updated : Feb 8, 2020, 9:15 AM IST

लंडन- रियालन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी हे दिवाळखोरीच्या मार्गावर असल्याचे समोर आले आहे. एकेकाळी जगातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत असलेले अनिल अंबानी यांच्या उद्योगांची बाजारातील पत आता शून्यावर आली आहे. अंबानी आता धनाढ्य नाहीत, असे त्यांच्या वकिलांनी शुक्रवारी ब्रिटनमधील न्यायालयात स्पष्ट केले.

अनिल अंबानी यांनी २०१२ मध्ये वैयक्तिक हमीवर तीन चीन बँकाकडून ९२५ दशलक्ष डॉलर कर्ज घतले होते. त्यातील ६८० दशलक्ष डॉलर रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. सहा आठवड्याच्या आत १०० दशलक्ष डॉलर रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायलयाने त्यांना दिले आहेत. अंबानी यांच्या व्यवसायाचे मूल्य (नेट वर्थ) शून्य असल्याचा दावा न्यायालयाने मान्य केला नाही.

कर्ज घेताना मालमत्तेच्या अधिकारांसबंधित कोणतीही वैयक्तिक हमी दिली नसल्याचा दावा अनिल अंबानी यांनी केला आहे. देणीदारीच्या तुलनेत अनिल अंबानी यांच्या मालमत्तांचे मूल्य शून्य झाले आहे. बँकांचे कर्ज घेण्यासाठी कोणतीही विकता येण्याजोगी मालमत्ता नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले न्यायालयात सांगितले आहे.

Last Updated : Feb 8, 2020, 9:15 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details