नवी दिल्ली - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील 'विझाग' रासायनिक प्रकल्पात झालेली वायुगळतीची घटना गंभीर असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. या वायुगळतीमुळे एका लहान मुलासह सहा जणांना जीव गमवावा लागला. तर, शंभरहून अधिक जणांना रुग्णालयात दाखल केले आहे. ही बाब दुःखद असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. तसेच सरकार या घटनेची बारकाईने माहिती घेत असल्याचे ते म्हणाले.
'विझाग येथे झालेल्या वायुगळती विषयी मी एनडीएमए अधिकाऱ्यांशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी ही संपर्क साधला आहे. आम्ही या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व घटनेची बारकाईने छाननी करत आहोत. या विषयी अधिक माहिती घेतली जात आहे,' असे ट्विट शाह यांनी केले आहे.