महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्रप्रदेशात सरकारी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप - रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू

शुक्रवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहाटे 3 वाजता एका व्यक्तीला अनंतपूर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णाचा मृत्यू
रुग्णाचा मृत्यू

By

Published : Jul 25, 2020, 6:01 PM IST

अमरावती -आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात वैद्यकीय निष्काळजीपणाचे प्रकरण समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी वेळेवर उपचार न केल्याने पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या पत्नीने केला आहे. रुग्णालयाच्या बाहेर खूप वेळ बसून राहिलो. मात्र, कोणीच मदतीला आले नाही, असे महिलेने म्हटले आहे.

शुक्रवारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पहाटे 3 वाजता एका व्यक्तीला अनंतपूर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. 'माझी गर्भवती मुलगी आणि मी, पतीला रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे खूप विनंती केली. मात्र, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. रुग्णालयाच्या बाहेर झाडाखाली आम्ही खूप वेळ वाट पाहिली. मात्र, कोणीही मदतीला आले नाही. त्यामुळे पतीचा मृत्यू झाला, असे रुग्णाच्या पत्नीने सांगितले.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. रुग्णाचे कुटुंबीय जिल्हा रुग्णालयात तत्काळ आले नाहीत. ज्यावेळी ते रुग्णालयात आले, तेव्हा रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने दगावला, असे रुग्णालय अधिक्षकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details