महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेश विधानसभा : वायएसआर काँग्रेस ४२ जागांवर विजयी तर १०७ जागांवर पुढे - assembly

बहुतांश पोल हे पोल्स केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशालील नॅशनल डेमोक्रैटिक अलायन्सचे (एनडीए) सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशच्या निकालासंदर्भात वेगवेगळ्या शक्यती वर्तवण्यात आल्या होत्या.

जगन मेहन रेड्डी, चंद्रबाबू नायडू

By

Published : May 23, 2019, 8:13 AM IST

Updated : May 23, 2019, 7:32 PM IST

विजयवाडा (आंध्र प्रदेश ) - देशातील लोकसभा आणि काही राज्यामध्ये विधानसभा निवडणूक पुर्ण झाल्यानंतर आज निकाल काय लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाच्या आधी आलेल्या एग्झिट पोलने सर्वांची उत्सुकता वाढवली आहे. बहुतांश पोल हे पोल्स केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सचे (एनडीए) सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर आंध्र प्रदेशच्या निकालासंदर्भात वेगवेगळ्या शक्यती वर्तवण्यात आल्या आहे.

आंध्र प्रदेशमधील दोन पोलच्या अंदाजानुसार आंध्र प्रदेशात तेलुगू देशम पार्टी सरकार स्थापन करेल तर इतर दोन पोलच्या अंदाजानुसार वायएसआर काँग्रेस पक्षाचे सरकार हे १७५ जागांसह येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी ट्विट करुन सांगितले की, एग्झिट पोल हे जनतेची नस पकडण्यात अपयशी ठरले आहे. ते म्हणाले 'एग्झिट पोल चुकीचे ठरणार आहे. कारण प्रत्यक्षात जमीनीवर वेगळी परिस्थिती आहे. आंध्र प्रदेशात टीडीपीची सरकार बनेल तर केंद्रात गैर भाजपा सरकार बनेल.

LIVE :

०४.०० pm - वायएसआर काँग्रेस १०७ जागांवर पुढे तर ४२ जागांवर विजयी. टीडीपी २२ जागांवर पुढे तर ४ जागांवर विजयी

०२.०० pm - वायएसआर काँग्रेस १४० जागांवर पुढे तर टीडीपीची २४ जागांवर आघाडी

१२.१० pm - वायएसआर काँग्रेस १५२ जागांवर पुढे तर टीडीपीची २२ जागांवर आघाडी

११.३० am - वायएसआर काँग्रेस १४६ जागांवर पुढे तर टीडीपीची २७ जागांवर आघाडी

१०.२० am - वायएसआर १४४ जागांवर पुढे तर टीडीपीची ३० जागांवर पुढे

०९.१५ am - वायएसआर १०० जागांवर पुढे तर टीडीपीची २२ जागांवर आघाडी

Last Updated : May 23, 2019, 7:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details