महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्ट केल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्याचे निलंबन - Offensive Social Media Post

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याविरोधात पोस्ट केल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.

जगनमोहन रेड्डी
जगनमोहन रेड्डी

By

Published : Jun 4, 2020, 5:50 PM IST

चैन्नई -आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले.

माधवी असे महिलेचे नाव आहे. गुंटूर डीसीसीबीमध्ये कर्मचारी असलेल्या माधवी यांनी मुख्यमंत्र्यांविरूद्द लिहले होते. वायएसआरसीपीच्या काही कार्यकर्त्यांनी गुंटूर पोलीस स्टेशनमध्ये माधवीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही. सुब्रमणेश्वर राव यांनी माधवीला निलंबित केले.

यापूर्वी मेच्या सुरुवातीला आंध्र प्रदेश सीआयडी पोलिसांनी 60 वर्षांच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता. संबधित महिलेने विशाखापट्टणममधील गॅस गळतीच्या घटनेशी संबंधित प्रश्न आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details