अमरावती - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंगळवारी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोबाईल आधारीत अॅपचे अनावरण केले. कॉप्रिहेन्सिव्ह मॉनिटरींग ऑफ अॅग्रिकल्चर, प्राईज अॅड प्रॉक्यूरमेंट (CMAPP) असे या अॅपला नाव देण्यात आले आहे. या अॅपद्वारे शेतकऱ्यांना मालाच्या किंमती, विक्री, बाजार यांची माहिती मिळणार आहे, तसेच सरकारलाही कृषीक्षेत्राशी निगडीत खरेदी विक्रीचे निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
शेतमाल खरेदी- विक्रीसाठी आंध्रप्रदेशनं लॉन्च केलं मोबाईल अॅपलिकेशन
शेतकऱ्यांच्या तयार मालाला बाजारात भाव किती आहे, विक्री कोठे करु शकतो, खरेदीच्या सुविधा या सर्वांची माहिती अॅपद्वारे मिळणार आहेत.
मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी
मुख्यमंत्र्यांनी कृषी क्षेत्रात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांवर नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांच्या तयार मालाला बाजारात भाव किती आहे, विक्री कोठे करु शकतो, खरेदीच्या सुविधा या सर्वांची माहिती अॅपद्वारे मिळणार आहेत. ग्रामीण स्तरावरही मालाची खरेदी विक्री करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहे. मोबाईल अॅप कसे वापरायचे याचे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.