आंध्रप्रदेश -आंध्रप्रदेशमध्ये राज्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला आला असतानाच मुख्यमंत्री चंद्राबाबुंनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून प्रतिस्पर्ध्यांवर टीका केली आहे. वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे चंद्राबाबुंचे प्रतिस्पर्धी आहेत. ते दोघेही नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू म्हणाले. ते मच्छलीपट्टणम भागातील राजकीय रॅलीत संबोधत होते.
चंद्राबाबू नायडू यांनी जगमोहन रेड्डी व केसीआर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, जगमोहन रेड्डी हे कुत्र्याचे बिस्कीट खातात, हे लाजिरवाणे आहे. ते बिस्किट आपल्यामध्येही वितरित करत आहेत. जगमोहन रेड्डी आणि केसीआर हे मोदींचे पाळीव कुत्रे आहेत. ते एका बिस्किटासाठी मोदींच्या पायाशीही जाणार आहेत. सावध रहा, ते बिस्किट जगन आपल्यामध्येही वितरित करणार असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.