अमरावती -आंध्र प्रदेशच्या काकारापाडू गावात गुरे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला. ट्रकमध्ये एकूण ४० जनावरे नेली जात होती. संपूर्ण ट्रकच पलटी झाल्यामुळे त्यापैकी ३० जनावरांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर, १० जनावरे जखमी आहेत.
जनावरांची अवैध तस्करी करण्यासाठी म्हणून साधारणपणे रात्री अशाप्रकारे जनावरांची वाहतूक केली जाते. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेल्यामुळे, या घटनेतही असाच प्रकार झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जखमी जनावरांना पळवून नेले आहे.
आंध्रामधील अपघातात ३० जनावरांचा दुर्दैवी मृत्यू, १० जखमी.. - आंध्र प्रदेश अपघात
आंध्र प्रदेशच्या काकारापाडू गावात गुरे घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झाला. ट्रकमधून एकूण ४० जनावरे नेली जात होती, त्यापैकी ३० जनावरांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, १० जनावरे जखमी आहेत. दुर्घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी जखमी जनावरांना पळवून नेले आहे.
Andhra Accident cause death of 30 cattles