महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला: ५ जवानांना वीरमरण, १ दहशतवादी ठार - ठार

दहशतवादी आणि जवानांत उडालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या ५ जवानांना वीरमरण आले असून तर, १ दहशतवादी ठार झाला आहे.

अनंतनाग दहशतवादी हल्ला

By

Published : Jun 12, 2019, 7:36 PM IST

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे २ दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये उडालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या ५ जवानांना वीरमरण आले असून तर, १ दहशतवादी ठार झाला आहे. तर, एक स्थानिक महिलाही गोळीबारात जखमी झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'अल उमर'ने घेतली आहे.

अनंतनाग येथे दहशतवादी हल्ला
जखमी जवानांवर उपचार

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथे केपी रोडवरुन केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याआधीही पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर, सीमारेषेवर राहणाऱ्या स्थानिकांचेही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता, भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे अनंतनाग परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details