ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा मोठे नाटक' - महात्मा गांधी

'या तथाकथित नेत्यांना कधीही पोलिसांनी मारहाण केली नाही. स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा होता' असे आक्षेपार्ह विधान हेगडे यांनी केले.

Anantkumar hedge
अनंतकुमार हेडगे, भाजप खासदार
author img

By

Published : Feb 3, 2020, 8:02 AM IST

बंगळुरू - भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या महात्मा गांधींवरील वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वात लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटक होते, असे वक्तव्य बंगळुरूत एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी केले. अशा लोकांना महात्मा कसे काय संबोधिले जाते, असा वादग्रस्त सवालही त्यांनी केला.

हेही वाचा - जामिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ अज्ञातांकडून पुन्हा गोळीबार

हा संपूर्ण स्वातंत्र्य लढा ब्रिटिशांच्या संमतीने आणि पाठिंब्याने लढला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 'या तथाकथित नेत्यांना कधीही पोलिसांनी मारहाण केली नाही. स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक होते. ही खरी लढाई नसून हा जुळवून आणलेला लढा होता' असे आक्षेपार्ह विधान हेगडे यांनी केले.

हेही वाचा - भाजपाला सावरकरांचा आलेला कळवळा ही राजकीय कावेबाजी - सचिन सावंत

महात्मा गांधींचे उपोषण आणि सत्याग्रह हेही नाटकच होते, असेही ते यावेळी म्हणाले. 'गांधींच्या उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असे काँग्रेसला पाठिंबा देणारे लोक मानतात. हे खोटे असून इंग्रजांनी निराशेतून भारताला स्वातंत्र्य दिले. जेव्हा मी इतिहास वाचतो तेव्हा माझे रक्त खवळते' असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details