महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना ; 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू - जनपूरा भागामध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली

शहरातील भजनपूरा भागामध्ये  निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे.

इमारत कोसळून दुर्घटना
इमारत कोसळून दुर्घटना

By

Published : Jan 25, 2020, 7:31 PM IST

Updated : Jan 25, 2020, 7:50 PM IST

नवी दिल्ली -शहरातील भजनपूरा भागामध्ये निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. जवळपास 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

ढिगाऱ्याखाली विद्यार्थी अडकल्याची शक्यता...
जनपूरा भागामध्ये निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना ...


संबधित इमारतीमध्ये शिकवणी वर्ग सुरू असल्याची माहिती आहे. या पथकानं आतापर्यंत ढिगाऱ्या खालून काही जणांना बाहेर काढलं असून जवळपास 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.

Last Updated : Jan 25, 2020, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details