रांची - झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील पथरगामाच्या आरती मिश्रा या मुलीने आपल्या आवाजात कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी एका सुरेख गीताच्या माध्यमातून संदेश दिला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी आरतीच्या या गाण्याचे कौतुक करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
चिमुकल्या आरतीने 'कोरोनाबाबत जागरुकते'साठी गायले गाणे, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेंकडून कौतुक - rupesh mishra
झारखंडच्या ८ वर्षीय आरती मिश्ना हिने आपल्या सुरेख आवाजत 'कोरोना से बचा लो माता रानी' हे गीत गाऊन नागरिकांना जागरुकतेसाठी संदेश दिला आहे. तिचे वडीलदेखील एक पलैबॅक सिंगर आहेत.
आठ वर्षीय आरती मिश्रा हिने कोरोनापासून बचावाकरता 'कोरोना से बचा लो माता रानी' हे गाणे गाऊन त्याद्वारे संदेश दिला आहे. या गाण्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. सध्या आरती आपल्या पालकांसह मुंबईमध्ये राहत आहे. तिला गीत गायनाच्या कलेचा वारसा तिचे वडील आणि गायक रुपेश मिश्रा यांच्याकडून मिळाला आहे.
गायक रुपेश मिश्रा हे गेल्या १८ वर्षांपासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहेत. रुपेश यांनी हिंदी, पंजाबी, भोजपूरीसह दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये अनेक गाणी गाऊन आपली ओळख निर्माण केली आहे. तर, आरतीने लहान वयापासूनच गायन सुरू केले असून आत्तापर्यंत अनेक भजन गायले आहेत. रुपेश मिश्रा हे मूळचे गोड्डा जिल्ह्यातील पथरगामा येथील रहिवासी असून त्यांचा पूर्ण परिवार अजूनही पथरगामातच वास्तव्यास आहे. रुपेश यांचे वडील शैलेश मिश्रा हे पथरगामा येथील एका महिला महाविद्यालयात प्राचार्य आहेत.