अश्लील संकेतस्थळांची उपलब्धता आणि अश्लील व्हिडिओ पाहण्याचे अतिप्रमाण हे घटक तरूणांना चुकीच्या मार्गावर जाण्यास भाग पाडत आहेत. स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स, अधिक स्वातंत्र्य, आईवडलांच्या ईशाऱ्यांकडे दुर्लक्ष आणि समुपदेशनाचा अभाव यांच्या जोडीला स्वस्त इंटरनेटची सहज उपलब्धता या घटकांना देशभरात होत असलेल्या बलात्कार आणि लैंगिक हल्ल्यांना जबाबदार धरता येईल.
हैदराबादमधील दिशा या पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर जो पाशवी बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आणि नंतर तिला जाळण्यात आले, हे अशा घटनांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मद्याच्या नशेत असलेल्या चार तरूणांनी, ज्यापैकी तिघे हे अवघे २० वर्षांचे होते, अमानवी आणि निर्दयी पातळीवर जाऊन असहाय्य दिशाला,तिची दुचाकी पंक्चर करून सापळ्यात अडकवले आणि बलात्कार आणि खून केल्यानंतर तिला जाळले.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, अधिक स्वातंत्र्य, वाईट मित्रांची संगत आणि इंटरनेट आणि अश्लील व्हिडिओंची सहज उपलब्धता हे अशा भयंकर प्रकरणांतील खरे गुन्हेगार आहेत. तरूण महिला आणि मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांकडे वळत आहेत, ही एक काळजीची गोष्ट आहे. डेहराडून येथे काही वर्षांपूर्वी, अश्लील संकेतस्थळांच्या प्रभावाखाली असलेल्या तरूणांनी, आपल्याच मैत्रिणीवर ती एकटी असल्याचे पाहून लैंगिक अत्याचार केले. पोलिसांना असे आढळले की, हे तरूण नियमितपणे अश्लील संकेतस्थळे आणि अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर पाहत होते. स्मार्टफोनचा सुळसुळाट आणि सहज उपलब्ध असलेले इंटरनेट यामुळे ब्ल्यू फिल्म पाहण्याचे प्रमाण वाढले असून लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांची संख्याही वाढली आहे.
उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, २०१५ मध्ये केंद्र सरकारने इंटरनेटवरील तब्बल ८५७ अश्लील संकेतस्थळे आणि बीभत्स संकेतस्थळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर, जवळपास ८२७ इंटरनेट संकेतस्थळांनी आपल्या अश्लील वेबसाईट्स बंद केल्याचे जाहीर करण्यात आले. तरीसुद्धा, अश्लील संकेतस्थळे आणि व्हिडिओंचा प्रश्न तसाच आहे.
हेही वाचा -हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी SIT गठीत, टीमचं नेतृत्व 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे