महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पाऊलखुणा! लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरीब कामगारांच्या प्रवासकथा... - Coronavirus Update

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रेल्वे आणि बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आणि इतर राज्यांमध्ये अडकलेल्या अनेक गरीब स्थलांतरित कामगारांनी लांबच्या ठिकाणांहून आपल्या गावी जाण्याचा प्रवास सुरू केला.

an article on Poor Man Journey during lockdown.
an article on Poor Man Journey during lockdown.

By

Published : Apr 25, 2020, 3:06 PM IST

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर रेल्वे आणि बसेसची वाहतूक बंद करण्यात आली आणि इतर राज्यांमध्ये अडकलेल्या अनेक गरीब स्थलांतरित कामगारांनी लांबच्या ठिकाणांहून आपल्या गावी जाण्याचा प्रवास सुरू केला. काही जण चालत निघाले, काही सायकलवर आणि काहींनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे रुळाच्या शेजारुन चालत प्रवास केला. तरुणांपासून वृद्धांपर्यंत, अगदी गर्भवती महिलांनीदेखील अशा पद्धतीने प्रवास केला.

अशा खडतर प्रवासांचा कालक्रम -

  • 26/03/2020 -रोजंदारीवर काम करणाऱ्या 26 वर्षीय कामगाराने नागपूरहून चंद्रपूर येथे आपल्या घरी पोहोचण्यासाठी 135 किलोमीटरचा प्रवास अन्नाशिवाय केला. पुण्यात कामगार म्हणून काम करणाऱ्या नरेंद्र शेळके यांनी आपल्या जांभ गावी परत जाण्याचे ठरवले. चंद्रपूर जिल्ह्यातील साओली तहसीलमध्ये हे गाव आहे. त्यांना पुण्याहून नागपूरला जाणारी शेवटची रेल्वे गाठण्यात यश आले. परंतु ते नागपूरमध्येच अडकले. त्यानंतर, त्यांनी दोन दिवस चालत प्रवास केला. यावेळी त्यांना जेवण मिळाले नाही, ते केवळ पाण्यावर जगले. पोलिसांनी त्यांना नागपूरपासून 135 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तहसील येथील शिवाजी पार्क येथे पाहिले. त्यानंतर, पोलिसांनी सिंदेवाहीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभ गावी सोडण्यासाठी वाहनाची सोय केली.
  • 26/ 03/2020 - एका 80 वर्षीय वृद्ध पुरुषाला आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात आपल्या घरी पोहोचण्यासाठी सुमारे 100 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. खागेन बारुआह असे त्यांचे नाव. लखीमपुर जिल्ह्यातील लालुक परिसरात वास्तव्यास असणारे बारुआह पंतप्रधानांनी लॉकडाऊन घोषित करण्यापुर्वी गुवाहाटी येथे गेले होते. ते गुवाहाटीहून रेल्वेनी नागाव जिल्ह्यातील कालिआबोर येथे पोहोचले. परंतु त्यांना कोणतेही सार्वजनिक वाहतुकीचे साधन मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी कालिआबोरहून 215 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत जाण्यासाठी सुरुवात केली. कालिआबोरहून 100 किलोमीटर अंतर पायी कापल्यानंतर ते बिस्वनाथ चारली येथे पोहोचले. काही स्थानिकांनी त्यांना पाहिले आणि ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनादेखील माहिती दिली.
  • 29/03/2020 -39 वर्षीय रणवीर सिंह, दिल्लीतील तुघलकाबाद येथील रेस्टॉरंटमध्ये डिलीव्हरी बॉय म्हणून काम करीत होते. मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील अंबा येथील ते रहिवासी. रेस्टॉरंट बंद झाल्याने त्यांना कामावरुन कमी करण्यात आल्याने सिंह यांनी शुक्रवारी घरची वाट धरली. शनिवारी सकाळी आग्रा येथे कोसळण्यापुर्वी त्यांनी सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास केला होता.
  • 29/03/2020 -गेली दहा वर्षे दिल्लीमध्ये काम करणाऱ्या एका गवंड्याने सुमारे 800 किलोमीटरचा पायी प्रवास केला. अखेर 29 मार्च रोजी त्यांना आपल्या उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर येथील नडवा गावी पोहोचण्यात यश आले. ओम प्रकाश (38) यांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पाच रात्री आणि सहा दिवसांचा कालावधी लागला. सर्वप्रथम त्यांनी बाराबंकीपर्यंतचा 580 किलोमीटरचा प्रवास चालत केला, एलपीजी डिलीव्हरी व्हॅनमधून बलरामपूर येथे पोहोचले आणि पुन्हा ऊर्वरित 240 किलोमीटर अंतर पायी पार केले. जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घरच्यांना मोठा दिलासा मिळाला.
  • 29/03/2020 - एक गर्भवती महिला आणि तिच्या पतीने उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील रथ परिसरातील औंता गावात पोहोचण्यासाठी 200 किलोमीटर पायी प्रवास केला. ते दोघे नोयडा येथे बांधकामाच्या ठिकाणी रोजंदारीवर पाच वर्षे काम करीत होते. अंजू देवी, 25, आठ महिन्यांच्या गर्भवती असून त्यांनी हे अंतर दोन दिवस आणि दोन रात्रीत पार करत रविवारी रात्री आपले गाव गाठले. रथ येथे पोहोचल्यानंतर अंजू आणि अशोक, 28 यांनी समुदाय आरोग्य केंद्राला भेट दिली आणि वैद्यकीय चाचणी करुन घेतली.
  • 31/03/2020 - दीपक यांनी लॉकडाऊनदरम्यान शालीमार गार्डन येथे राहणाऱ्या आपल्या अस्वस्थ झालेल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आग्रा ते दिल्लीचा प्रवास केला. त्यांच्या कुटुंबात गर्भवती पत्नी, दीड वर्षाची मुलगी आणि आजारी आई आहे. हे अंतर होते 200 किलोमीटर.
  • 01/04/2020 - गर्भवती महिला, तिचा पती आणि दोन वर्षाच्या मुलाने घरी जाण्यासाठी सुरत, गुजरात ते बांदा, उत्तर प्रदेशपर्यंत रेल्वे रुळाचा मागोवा घेत तसेच रस्त्यावरुन पायी प्रवास केला. उत्तर प्रदेशातील त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी त्यांनी 1066 किलोमीटर अंतर पार केले.
  • 02/04/2020 - एका 24 वर्षीय गरीब महिलेने उत्तर प्रदेशातील मथुरा ते पन्ना पर्यंतचे 500 किलोमीटर अंतर चालत पार केले. कल्ली बाई या पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपला प्रवास 29 मार्च रोजी सुरु केला आणि 31 मार्च रोजी आपले गाव गाठले. 2 एप्रिल रोजी त्यांनी सुदृढ बालकास जन्म दिला.
  • 02/04/2020 - तमिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील वर्धा ते हैदराबादपर्यंतचा 454 किलोमीटरचा प्रवास केला. यापैकी काही प्रवासी पायी होता. हैदराबादमधील मारेडपल्ली पोलीस हद्दीतील तात्पुरत्या निवाऱ्यात आश्रयी असताना थकवा आणि डिहायड्रेशनमुळे त्याचा मृत्यू झाला. त्याने 30 मार्च रोजी नागपूर सोडले होते.
  • 04/04/2020 - तमिळनाडूतील तिरुवरुर जिल्ह्यातील सात तरुण लॉकडाऊननंतर महाराष्ट्रात आपल्या कामाच्या ठिकाणी अडकले होते. पायी आणि इतर वाहनांची मदत घेत तब्बल 1,000 किलोमीटरचे अंतर पार करुन ते त्रिची येथे पोहोचले.
  • 9/04/2020 - बोधान, निझामाबाद येथील एका महिला शिक्षकेने आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी खडतर प्रवास स्वीकारला. आपल्या मुलाला नेल्लोरहून आणण्यासाठी त्यांनी 1400 किलोमीटरचा प्रवास केला.
  • 11/04/2020 -ओडिशातील तरुणाने घरी पोहोचण्यासाठी 1700 किलोमीटर अंतर पार केले. लॉकडाऊननंतर नोकरी सुटली आणि त्याने सात दिवस चार राज्यांमधून सायकलवर प्रवास केला. महेश जेना हे महाराष्ट्रातील सांगली-मिरज एमआयडीसीमध्ये आयर्न कास्टिंग फॅसिलिटीत काम करीत होते. त्यांनी 1 एप्रिल रोजी सुरुवात केली. ते प्रत्येक दिवसाला 200 किलोमीटर अंतर कापत होते. दिवसाला 16 तास सायकलिंग करुन त्यांनी 7 एप्रिलला जयपूर गाठले.

ABOUT THE AUTHOR

...view details